February 11, 2026

ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • कळंब – निजाम काळाच्या जड जाचक व्यवस्थेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रकाश देणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे कार्य आजही स्फूर्तिदायी आहे.त्यांच्या स्मृतीस कळंब येथे दि.१९ जून २०२५ वार गुरुवार रोजी भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात विराजमान असलेल्या गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या आदर्शाचा सन्मान करण्यात आला.
    ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या समारंभास मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,ज्ञानोद्दोग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळाचे प्राचार्य शिवाजी पौळ,महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
    निजाम काळाच्या अवघड परिस्थितीत ज्या जिद्दीने आणि समर्पणाने ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया घातला, त्याचा साक्षात्कार आजही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या घडवणीतून होत आहे. शिक्षणाच्या ज्वालेला अखंडतेने तेवत ठेवणाऱ्या गुरुजींचे जीवनकार्य आजही प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या स्मारकाच्या साक्षीने उपस्थितांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा अखंडपणे जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

  • ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे दि.१९ जून २०२५ रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव (अण्णा) मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे, परजणे धनंजय,श्रीमती पांचाळ उषा ,जाधव पांडुरंग आदी यावेळी उपस्थित होते.
error: Content is protected !!