लातूर – येथील ‘ G- 24 Latur ‘ या सामाजिक संघटनेच्या अंतर्गत स्थापन झालेल्या राजर्षी शाहू महाराज जयंती समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक प्रा.सुधीर अनवले यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब परांजपे वाचनालयात संपन्न झाली.यावेळी झालेल्या चर्चेत राजर्षी शाहू महाराज यांची जयंती दि.26 जून 2O25 रोजी मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे ठरले. सकाळी 8 :OO वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून रॅली काढण्यात येणार असून समारोप राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.या रॅलीमध्ये डाव्या -पुरोगामी आणि समविचारी संस्था – संघटना यांचा सहभाग मिळविण्याचे निश्चीत करण्यात आले.याशिवाय त्याच दिवशी सायंकाळी 5:OO वा. ” राजर्षी शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ” या विषयावर भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात प्रसिध्द साहित्यीक तथा विचारवंत डॉ.अशोक राणा ( यवतमाळ ) यांचे जाहिर व्याख्यान घेण्याचे ठरले. बैठकीच्या सुरुवातीस जयंती समितीचे सचिव डॉ.गणेश गोमारे यांनी मागील बैठकीतील इतिवृत्तांत सांगून 26 जून रोजी होणाऱ्या कार्यकमाची रूपरेषा सांगीतली.त्यास सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले. यावेळी प्रा.डॉ.अशोक नारनवरे, प्रा.डॉ.हर्षवर्धन कोल्हापूरे, प्रा.डॉ. मारोती गायकवाड,नरसिंग घोडके, रामराजे आत्राम, ॲड.वसंत उगले, शिवाजी शिंदे,इंजि.श्रीधर शेवाळे,यु.डी.गायकवाड, राजकुमार होळीकर आदींनी चर्चेत भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ‘ G-24’ च्या सभासदांनी तन -मन-ध धाने योगदान देण्याचे ठरले. शेवटी रामराजे आत्राम यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर ही बैठक विसर्जित करण्यात आली.
More Stories
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार
संताच्या वास्तव विचारांची पेरणी करावी – प्रा.उल्हास पाटील
भीम आर्मी विद्यार्थी फेडरेशन शहराध्यक्षपदी सागर साखरे यांची निवड