लोहटा (पश्चिम) – कळंब तालुक्यातील कै.वसंत विठ्ठल भोसले यांच्या १७ व्या पुण्यतिथीनिमित्त लोहटा (पश्चिम) येथे दिनांक २८ मे, बुधवार रोजी एक भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले “काळी आई वाचवूया अभियान – मिशन ३००० एकर”, याअंतर्गत शाश्वत शेती, सेंद्रिय उत्पादन व मातीत सुधारणा यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सेंद्रिय शेती तज्ञ श्याम जाधव व उत्तम जाधव उपस्थित होते.यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून सेंद्रिय शेतीचे फायदे,उत्पादन खर्च कमी करण्याचे मार्ग आणि जमिनीच्या सुपीकतेचा विकास यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कै.वसंत भोसले यांचे पुत्र ज्ञानेश्वर उर्फ राजे भोसले यांनी केले होते. सूत्रसंचालन प्रगतिशील शेतकरी व ज्येष्ठ नागरिक आत्माराम अडसूळ यांनी तर आभार प्रदर्शन लोहटा (पश्चिम) चे सरपंच संजय अडसूळ यांनी केले. या कार्यक्रमाला गावातील व परिसरातील अनेक शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सरपंच संजय अडसूळ,संभाजी जाधव, बाबासाहेब चव्हाण,प्रमोद चव्हाण,महेश कदम,संभाजी शिंदे,रामहरी पुरी,महादेव चव्हाण,रोहन अडसूळ,जिवन पवार,ज्ञानेश्वर माळी,ऋषिकेश पुरी,बंडू बिरू लांडगे,गोविंद टोणगे,सुमित अडसूळ आदी मान्यवर आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले आणि अशा प्रकारचे मार्गदर्शक व प्रेरणादायी कार्यक्रम गावामध्ये वारंवार व्हावेत,अशी अपेक्षा व्यक्त केली.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन