August 10, 2025

आथर्डी येथे श्री शनैश्वर जयंती उत्साहात साजरी

  • कळंब – कळंब तालुक्यातील आथर्डी येथे श्री शनैश्वर जयंती दि.२६ मे रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
    गेल्या २५ वर्षा पुर्वी आथर्डी गावात अनंत चौधरी यांनी स्वखर्चातून या शनिदेवाची विधीवत पुजा करून स्थापना केली.त्या वेळे पासून दर वर्षी शनि जंयती दि.२६ मे रोजी विविध पूजा आर्चा करून कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली .
    यावेळी शनैश्वर जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे रात्रभर भजन ,किर्तन झाले त्यानंतर आरतीचे आयोजन करण्यात आले होते.दि.२६ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे (अन्नदान ) करण्यात आले . यावेळी कळंब व वाशी आणि केज परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी शनि देवाचे मनोभावाने दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.
error: Content is protected !!