June 25, 2025

प्रा.जाकेर काझी यांना राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे हिंदी विभागाचे प्रा.जाकेर काझी यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय हिंदी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
    हा गौरव नेवासा,जिल्हा अहमदनगर येथे पार पडलेल्या दोन दिवसीय हिंदी अधिवेशन दरम्यान करण्यात आला. पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सत्यजित तांबे,राज्याध्यक्ष डॉ. निखील कांबळे,राज्य सचिव रंगनाथ कर्डिले,राज्य कार्याध्यक्ष राजकुमार कांबळे,साहेबराव घाडगे पाटील (माजी मंत्री) तसेच त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
    या यशाबद्दल संस्थेच्या वतीने सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर, प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,तसेच हिंदी विभाग प्रमुख प्रा.दत्ता साकोळे,प्रा.विलास आडसूळ, प्रा.विलास वमन,प्रा.डॉ.
    आप्पासाहेब मिटकरी,प्रा.गोविंद काकडे,पर्यवेक्षक हांडिबाग आदींनी प्रा.जाकेर काझी यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
    हा सन्मान हिंदी भाषेच्या प्रचारक व शिक्षकांच्या कार्याबद्दल दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार असून,प्रा.काझी यांच्या शिक्षक म्हणून घेतलेल्या मेहनतीस व समर्पित योगदानास मिळालेली ही पावती ठरली आहे.
error: Content is protected !!