लातूर – प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड च्या वतीने महाराष्ट्रस्तरीय समाज रत्न पुरस्कार 2025 सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड ही संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे.यामध्ये प्रामुख्याने भीम आर्मी भारत एकता मिशन मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे यांची सर्वानुमते समाजभूषण पुरस्कार देण्यासाठी निवड करण्यात आलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी धावून जाऊन निःस्वार्थपणे लोकांना न्याय देण्याचे काम विनोद कोल्हे हे करतात.दोन वर्षांपूर्वी विनोद कोल्हे यांना हृदयविकाराचा झटका येवूनही,डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला असतानाही अहोरात्र समाजासाठी पायाला भिंगरी रालावून फिरणारे विनोद कोल्हे यांना गेल्या वर्षी चाकूर या ठिकाणी गांजूर गावातील लोकांना न्याय मिळवून देत असताना पोलीस प्रशासनाच्या वतीने खोटे गुन्हे दाखल करून स्वतः सह अकरा लोकांवरती 353 अंतर्गत गुन्हे दाखल करून 15 दिवस झेलमध्ये ठेवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केले होते.तरीही न डगमगता भीम आर्मीच्या मार्फत संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवत आपली मराठवाड्यामध्ये नवीन ओळख करून दिली म्हणून विनोद कोल्हे यांना प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार 2025 हा देण्यात येत आहे.हा पुरस्कार प्रज्ञा बहुउद्देशीय सेवाभाव संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष किरण सदावर्ते तसेच महाराष्ट्रातील काही मान्यवर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
More Stories
“सदा सर्वकाळ शिक्षकांच्या अडी–अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहिन” – शिक्षक आमदार विक्रम काळे
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना लातूर येथे अभिवादन
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार