धाराशिव (जिमाका)– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वयंसहायता बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने पुरवठा करण्याची योजना सन २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत सन २०२५ -२६ साठी धाराशिव जिल्ह्यातील इच्छुक बचत गटांनी २६ मे ते २५ जून २०२५ या कालावधीत http://mto.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.ऑनलाईन अर्जाची एक प्रिंट व आवश्यक कागदपत्रांची सत्यप्रत १० जुलै २०२५ पर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे सादर करणे आवश्यक आहे,असे श्री.बी.जी. अरवत,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, धाराशिव यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला