June 22, 2025

शिवव्याख्याते सुजित नामदेव तांबे यांच्यातर्फे पुस्तके भेट

  • कन्हेरवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी शाळेस 1 मे महाराष्ट्र दिन या दिनाचे औचित्य साधून सुजित नामदेव तांबे (कवी, लेखक व शिवव्याख्याते) यांनी “शिवछत्रपती सूत्र विश्वाचे” हे अतिशय सुंदर व स्वलिखित असलेले पुस्तक.10 प्रतीत शाळेच्या बाल वाचनालयास सप्रेम भेट दिले.
    लालासाहेब जाधव व ॲड.रामराजे जाधव सरपंच यांचे हस्ते शाळेचे मुख्याध्यापक भंडारे बी.एन.यांच्याकडे ही पुस्तके सुपूर्द केली.
    याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक,पत्रकार रामराजे जगताप, पांडुरंग जाधव, विक्रम अण्णा कवडे व शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. महाराष्ट्र दिन,विद्यार्थी निकाल व पुस्तके भेट या कार्यकमाचे सूत्रसंचालन दीपक चाळक यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार नारायण झोरी यांनी मानले.
error: Content is protected !!