लातूर – “जयभीम पँथर एक संघर्ष” हा एक अन्याय आणि अत्याचारला वाचा फोडणारा व येणाऱ्या नवतरुण पिढीला सामाजिक संघर्षाची जाणीव करून देणाऱ्या संघर्षाचे वास्तव चित्रण या चित्रपटाद्वारे प्रकटीकरण केले जाणार आहे. तरी लातूर येथील सर्व प्रेक्षक व आंबेडकरी अनुयायांनी दि.११ एप्रिल रोजी महाराष्ट्रतील सर्व चित्रपटगृहात जाऊन जयभीम पँथर एक संघर्ष चित्रपट पहावा असे आवाहन चित्रपट निर्मिती प्रमुख संतोष गाडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दि.६ एप्रिल २०२५ रोजी केली आहे. “जयभीम पॅंथर एक संघर्ष” या चित्रपटाचे प्रसिद्धी सोहळा लातूर शहरात पु.भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आला.चित्रपट निर्मिती प्रमुख संतोष गाडे व त्यांची टीम शासकीय विश्रामगृह,लातूर येथे आली होती.यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष पु.भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो,पु.भिक्खू पय्यानंद थेरो, भंते बुद्धशील,भंते बोधिराज यांची उपस्थिती होती. लातूर शहरात हा चित्रपट पी. व्ही.आर.टॉकीज येथे प्रदर्शित होणार असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी व सर्व आंबेडकर अनुयायांनी हा चित्रपट पहावा असे आवाहनही पु.भिक्खू पय्यानंद थेरो यांनी या वेळी केले आहे. या प्रसंगी प्राचार्य डॉ.दुष्यंत कटारे,डॉ.विजय अजनिकर, इंजि.अरुण गायकवाड,प्रा. विश्वनाथ आल्टे,डी.एस.नरसिंगे, सुशीलकुमार चिकटे,राम कोरडे, राहुल कांबळे,अक्षय धावारे, गोविंद कांबळे,ऍड.रमक जोगदंड,लक्ष्मण कांबळे,मिलिंद धावारे,सुजाता अजनिकर ई.सह विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती समितीचे सर्व पदाधिकारी,सन्मानीय पत्रकार बांधव उपस्थित होते.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग