August 9, 2025

जिल्हास्तर युवा पुरस्कार:१५ एप्रिलपर्यंत अर्ज मागविले

  • धाराशिव (जिमाका) – धाराशिव जिल्ह्यातील युवकांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी १५ एप्रिलपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.सन २०२३-२४ व २०२४ -२५ या दोन वर्षांसाठी एक युवक,एक युवती आणि एक नोंदणीकृत संस्थेला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
    पुरस्काराचे स्वरूप – गौरवपत्र, सन्मानचिन्ह आणि युवक व युवतीस प्रत्येकी १० हजार रुपये तर संस्थेस ५० हजार रुपये रोख रक्कम असे आहे. पुरस्कारासाठी निवड करताना ग्रामीण व शहरी भागात केलेले सामाजिक कार्य,राष्ट्रउभारणी,पर्यावरण,शिक्षण,आरोग्य,महिला सक्षमीकरण,व्यसनमुक्ती,विज्ञान – तंत्रज्ञान,क्रीडा,कला,सांस्कृतिक क्षेत्र,आपत्ती व्यवस्थापन,झोपडपट्टी सुधारणा,साहसी कार्य,तसेच राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करणारे उपक्रम यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे.
    अर्जदारांनी मागील तीन वर्षांत (दि.१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत) केलेल्या कार्याचा तपशील सादर करावा.अर्जासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे संपर्क साधावा.सर्व अर्ज १५ एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे,अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी दिली.
error: Content is protected !!