June 21, 2025

गणेश पांचाळ यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

  • पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले) – तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील सुपुत्र गणेश रामलिंग पांचाळ यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवत मृद व जलसंधारण विभागात जलसंधारण अधिकारी या पदावर निवड मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दि.२७ मार्च २०२५ रोजी गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
    गणेश पांचाळ यांनी लहानपणापासूनच शिक्षणात प्रगतीशील राहून आपल्या जिद्दीच्या जोरावर हे स्थान मिळवले आहे.जलसंधारण अधिकारी म्हणून ते जलसंधारण, पाणी व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यासाठी योगदान देणार आहेत.त्यांच्या या निवडीमुळे संपूर्ण गावाला अभिमान वाटत आहे.
    गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभात आनंद व्यक्त करताना अशोक जगताप यांनी सा.साक्षी पावनज्योतला सांगितले की, गणेश पांचाळ हे युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून त्यांनी आपल्या जिद्दीने हे यश संपादन केले आहे.भविष्यात ते अधिक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडतील,अशी सर्वांची अपेक्षा आहे.
    गणेश पांचाळ यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब,शिक्षक आणि गावकऱ्यांना दिले.त्यांनी सांगितले की,”ग्रामदेवी कुलदेवी आई अंबाबाईच्या कृपेसोबत माझे वडिल आबा यांचे आशीर्वाद लहानापासून अबालवृद्धापर्यंत सर्वांची माझ्यासाठी असलेली विशेष तळमळ सोबत माझे भाऊजी संतोष पांचाळ यांच्या आर्थिक आणि मानसिक पाठबळासोबत लहानांचे प्रेम मोठ्यांचा आशीर्वाद मित्रांचे सहकार्यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.आता या पदावर काम करताना समाजहितासाठी सर्वोत्तम प्रयत्न करेन.”
    याप्रसंगी माजी सरपंच प्रकाश टेकाळे,खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल टेकाळे,अशोक दशवंत,विक्रम धस,गुरुलिंग स्वामी,बालाजी पांचाळ,रामेश्वर पौळ व अशोक जगताप आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!