कळंब (महेश फाटक ) – महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती कळंब शहरात उत्साहाने साजरी होत आहे. त्यानिमित्ताने शहरातील बालोद्यान येथे कायदेपंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुत्यास अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी या उद्यानात आपली उपस्थिती लावतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते.यामध्ये वृद्ध नागरिक, महिला पुरुष व बालक यांचा समावेश असतो.याचबरोबर येथे बालोद्यान असल्याने चिमुकली मुले खेळण्यासाठी येत असतात. या बागेच्या प्रवेशद्वारा समोर मोठा नाला आहे.या नाल्यावर महामार्गाचे गुत्ते घेतलेली कंपनी मेघा इंजीनियरिंग यांच्या माध्यमातून स्लॅब टाकण्यात आला आहे परंतु हा स्लॅप या बागे समोरील ठिकाणी पूर्णपणे फुटलेला असून अपघाताने या नाल्यालात पडून हात,पाय तुटण्याची शक्यता आहे.तरी उपविभागीय अधिकारी यांनी यामध्ये लक्ष देऊन तात्पुरती व्यवस्था म्हणून कळंब नगर परिषदेस नाली बंदिस्त करण्याविषयी सूचना करावी व होणारा अपघात टाळावा तसेच फिरते संडास व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन बहुजन जनता पक्षाच्या वतीने दि.२८ मार्च २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.या मागण्या मान्य नाही झल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर धाराशिव जिल्हाध्यक्ष नवनाथ भंडारे,तालुकाध्यक्ष आश्रुबा शिंदे, सामाजिक कार्यकर्ते बंडूभाऊ ताटे,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत,बजरंग धावारे,सुनिल ताटे, वाजिद काझी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले