इटकुर – ईटकुर बीट मधील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गामध्ये प्रवेशित होणाऱ्या प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश घेण्यासाठी ईटकुर बीटचा विशेष उपक्रम “गुढीपाडवा प्रवेश वाढवा” या अंतर्गत मागील दोन वर्षापासुन सदर उपक्रम संपूर्ण बीट मध्ये मोठ्या उत्साहात घेतला जातो. त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम ईटकुर बीट मधील जिप शाळेत दिसुन येत आहे.ईटकुर बीट मधील विद्यार्थी पट संख्या टिकून असल्याने संच मान्यतेचा परिणाम या शाळांवर होत नाही तसेच विद्यार्थी १ मार्च पासुन इयत्ता १ ली च्या वर्गात प्रवेशीत होतो. त्याचे शैक्षणिक गुणवत्ता विकास चांगल्या प्रमाणात होतो. जुन मध्ये तो विद्यार्थी आवश्यक कौशल्य प्राप्त करतो.त्यामुळे याही वर्षी या उपक्रमासाठी आज प्रवेश दिंडी आणि प्रवेशोत्सव बीट मधील सर्व शाळांमध्ये साजरा करण्यात आला.बीट मधील अनेक शाळांमध्ये ०१ मार्च २०२५ पासून इयत्ता १ लीचे वर्ग सुरू झालेले असून पालकांनी आपली मुले नजीकच्या शाळेत पाठवावीत असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्रीमान धर्मराज काळमाते बीट विस्तार अधिकारी सुशील फुलारी यांनी केले आहे.या स्तुत्य उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद धाराशिव यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात