June 20, 2025

स्त्री पुरुष समानता ही प्रथमतः भगवान बुध्दानी दिली – भिक्खु पय्यानंद थेरो

  • लातूर – जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देताना भिक्खु पय्यानंद थेरो म्हणाले कि, स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रथम स्पष्टपणे आणि प्रभावीपणे भगवान बुद्धांनी मांडला.त्यांच्या काळात समाजात स्त्रियांना अतिशय गौण स्थान दिले जात होते,आणि धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचा सहभाग नव्हता.भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघ स्थापन केला,जो त्या काळातील एक क्रांतिकारी निर्णय होता. त्यांनी स्त्रियांना धर्मशिक्षण, व ध्यान मार्गावर पुरुषांसारखीच संधी दिली. त्यांच्या मते, स्त्री आणि पुरुष दोघेही समान बुद्धिमत्ता आणि आध्यात्मिक क्षमता ठेवतात.
    याशिवाय, बुद्धांनी त्यांच्या प्रवचनांमध्ये अनेकदा महिलांचे महत्त्व आणि त्यांचे गुण अधोरेखित केले. प्रजापती,विशाखा,गौतमी,आणि आम्रपाली यांसारख्या स्त्रियांना त्यांनी मोठ्या सन्मानाने धम्मात स्थान दिले.
    त्यामुळे,सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट संदेश प्रथमच भगवान बुद्धांनी दिला असल्याचे भिक्खु पय्यानंद थेरो यांनी या वेळी प्रतिपादन केले.
    जागतिक महिला दिनाच्या औचित्याने राजा शुद्धोधन चारीटेबल ट्रस्ट तर्फे, राजा शुद्धोधन बुद्ध विहार,बालाजी नगर, नांदेड रोड,लातूर येथे समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल माता रमाई पूरस्कार देऊन गौरविण्यात आले.पू. भंतेजी पय्यानंद थेरो यांच्या हस्ते हा पुरस्कार शोभाताई सोनकांबळे,सूनिता ताई सोनकांबळे,आशा नरसिंगे या महिलांना या वेळी देण्यात आला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिरत्न घेण्यात आली. कार्यक्रमात प्रमूख पाहूणे म्हणून विनोद कोल्हे,मिलींद धावारे,उदय सोनवणे ,डाँ.अरुण कांबळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रस्तावीक राजा शुद्धोधन चारिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.आनंद सोनवणे यांनी केले.
    या वेळी कार्यक्रम यशस्वी ते साठी ट्रस्ट चे सूर्यकांत दांडे,विक्रम चिकाटे,गौतम सूर्यवंशी,विशाल कांबळे,हेमंत जाधव,दगडू साळवे,विनोद दांडे,राजकूमार राऊत,राजकूमार कांबळे,धम्मरत्न सोनवणे तसेच महिला मंडळ शारदा दांडे, कलम सूर्यवंशी,जयश्री कांबळे,अयोध्या कांबळे,सपना कांबळे,राऊत शूभांगी,पद्मीणी चिकाटे,विद्या ससाणे,लता सूर्यवंशी,महालिंगे ताई,व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!