धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 271 कारवाया करुन 2,12,650 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.08.03.2025 रोजी 18.30 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत सारोळा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-विनोद संपत साळुखे, वय 33 वर्षे, रा.सारोळा ता. जि. धाराशिव हे 18.30 वा.सु सारोळा येथे श्रीदेवी जुगाराचे साहित्यासह एकुण 1,290 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.08.03.2025 रोजी 20.00 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत वडगाव सिध्देश्वर येथील पुलाचे बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-व्यंकटेश मारुती कांबळे, वय 31 वर्षे, रा.अंबीका बॉडी बील्डरच्या पाठीमागे खाजा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 20.00 वा.सु मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 735 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ गोवंशी मांस वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-जाकीरखॉ नसिरखॅा पठाण, वय 52 वर्षे, रा. मोगलपुरा संगमनेर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर, मालक महंमद रफीक उस्मान कुरेशी, वय 33 वर्षे, रा. मदीनानगर संगमनेर यांनी दि.07.03.2025 रोजी 22.30 वा.सु.धुत्ता पाटी जवळ आयशर टेम्पो क्र एमएच 17 सी.व्ही. 3549 मध्ये 3 टन एकुण 3,60,000 ₹ किंमतीचे पशुवैद्यक विभागाची पुर्व परवानगी न घेता गोवंशाची गेकायदेशीरपणे कत्तल करुन संशयित गोमांस ताब्यात बाळगुन वाहतुक करत असताना बेंबळी पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5 (क), 9(अ), प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम सह कलम 3(5) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
परंडा पोलीस ठाणे:आरोपी नामे-नवनाथ प्रल्हाद लांडगे, वय 40 वर्षे, रा. पारेवाडी ता. परंडा जि. धाराशिव,बालाजी लक्ष्मण वाघमारे,रा. मुंगशी रोड सोमवार गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.08.03.2025 रोजी 18.15 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे वाहन क्र एमएच 14 एलएल 2224 वाहन क्र एमएच 45 7157,ही वाहने जेवळीएस बी आय बॅक परंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये परंडा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-श्रीराम भरत मोरे, वय 30 वर्षे, रा. निजामाबाद ह.मु. आई गायकवाड बंगलो पोलीस कॉलनी काळेवाडी पुणे हे व त्यांचे कुटुंबीय असे दि. 08.03.2025 रोजी 13.45 वा. सु. श्री तुळजाभवानी मातेच्या देवदर्शनासाठी आले असता तुळजाभवानी देवीचे मंदीरात होमाचे दर्शन करत असताना श्रीराम मोरे यांचे पत्नीच्या पर्स मध्ये ठेवलेली 6 ग्रॅम वजनाची अंगठी व रोख रक्कम 1000₹ आर एकुण 55,000₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीराम मोरे यांनी दि.08.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-कुलदीप चोंदे, रा. कळंब ता.कळंब जि. धाराशिव यांनी दि. 19.02.2025 रोजी 22.30 वा. सु.जिल्हा परिषद शाळा कंम्पाउंड जवळ कळंब येथे फिर्यादी नामे-गणेश लहु मोहीते, वय 24 वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने दारु पिण्यासाठी पैसे न देण्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी चाकूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गणेश मोहीते यांनी दि.08.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 109, 115(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे-सतीश जगताप, रा. पांढरेवाडी ता. परंडा जि. धाराशिव व इतर सात इसम यांनी दि.03.03.2025 रोजी 14.30 वा. सु. पाढंरेवाडी येथे फिर्यादी नामे-बाबासाहेब महादेव गिरी, वय 49 वर्षे, रा. देधोवडी पोस्ट पाथ्रुड ता. भुम जि. धाराशिव यांचा मुलगा माउली बाबासाहेब गिरी यास नमुद आरोपींनी अज्ञात कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड,काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाबासाहेब गिरी यांनी दि.08.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन अंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 189,191(2),193(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड, अक्षय शिवाजी गायकवाड दोघे रा. आंबेवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.07.03.2025 रोजी 15.00 वा. सु. आंबेवाडी शिवारात फिर्यादी नामे-श्रीराम तानाजी गायकवाड, वय 21 वर्षे, रा. आंबेवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-श्रीराम गायकवाड यांनी दि.08.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352,351(2),351(3),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
आनंदनगर पोलीस ठाणे: आरोपी नामे- अनिल राठोड, रा. सेवाजाज कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव व सोबत मयत नामे-राहुल राजेंद्र पवार,वय 28 वर्षे, रा. रमाईनगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे दोघे दि.15.02.2025 रोजी 24.00 वा.सु. बुलेट मोटरसायकल क्र एमएच 25 बी.सी. 0022 वरुन शिवाजी चौक ते तेरणा कॉलेजकडे येत असताना रोडवर धाराशिव येथे आरोपी नामे- अनिल राठोड यांनी त्याचे त्याचे ताब्यातील बुलेट मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून रोडलगत असलेल्या झाडाला धडकून अपघात झाला. या अपघातात राहुल पवार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जृवला राहुल पवार, वय 21 वर्षे, रमाईनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.08.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1), सह कलम 134 (अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
उपशिक्षणाधिकारी दत्ताप्रसाद जंगम यांचा राष्ट्रीय ओबीसी अधिकारी महासंघाचे वतीने सत्कार
माजी सैनिक पाल्याकरिता अग्निवीर सैन्य भरतीची संधी
खोट्या निवड याद्यांपासून सावध राहा:आरोग्य विभागाचे आवाहन