लातूर – २०१७ पासून लातूर शहर महानगरपालिका अंतर्गत वेगवेगळ्या संस्था मार्फत लातूर शहरातील कचरा या महत्वाच्या विषयावर स्वच्छता ताई म्हणून काही महिला काम करत होत्या. प्रत्येक घरा घरा मध्ये जाऊन ओला कचरा आणी सुका कचरा वेगळा करण्यासादर्भात माहिती देणे,कचरा अस्तवस्त फेकू नका, कचरा घंटा गाडीतच टाका आशी माहिती ह्या घरो घरी जाऊन स्वच्छता ताई माहिती देत आसत.करोनाच्या काळात हि स्वतःचा,परिवाराचा विचार न करता यांनी काम केल लातूर महानगरपालिका देशात स्वच्छता बाबतीत टॉप १० मध्ये आले होते.याचा विसर सध्या महानगरपालिका यांना झालेला दिसून येत आहे.सध्या महानगरपालिका यांनी नवीन कंपनीला टेंडर दिले आहे.त्या कंपनीने अशा स्वच्छता ताईला डावलून बाहेरगावचे कामगार आणून या ताईवर अन्याय करण्याचे काम येथील महानगरपालिका आणी टेंडर घेतलेल्या अधिकाऱ्याने केला आहे. सध्या लातूर शहर महानगरपालिका समोर स्वच्छता ताई ने आम्हाला कामावरती घ्यावे म्हणून दि.२४ फेब्रुवारी २०२५ पासून आंदोलन करत आहेत आणी मागण्या लवकर मान्य न झाल्यास मुंडन आंदोलन करु असा इशारा महानगरपालिका यांना दिला. तरी महानगरपालिका आयुक्त किंवा टेंडर घेणाऱ्यांना काहीही फरक पडलेला दिसून येत नाही.एकीकडे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात चालू असताना मुख्यमंत्री यांच्या बहिणीला पोटासाठी मुंडन आंदोलन करण्यास भाग पडले आहेत या लाडक्या बहिनेचे दुःख मुख्यमंत्री यांना दिसणार का,आंदोलन करणाऱ्या स्वछता ताई यांच्या परिस्थिती मुळे त्याठिकाणी मंडप हि टाकता आला नाही उन्हा मध्ये हे आंदोलन चालू आहे हे आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन भिम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे.आपल्या आंदोलनात भिम आर्मी आपल्या सोबत आहे असा शब्द यावेळी वकील आनंद भाऊ सोनवणे बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ सूर्यवंशी गौतम सूर्यवंशी मामा, विशाल कांबळे,हेमंत जाधव मामा उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे