लातूर – संपूर्ण विश्वाला २६०० वर्षापूर्वी महाकारूणीक तथागत भगवान बुद्धांनी धम्माचा उपदेश केला. त्यांनी धम्मामध्ये व्यक्तीच्या आचरणाला अधिक महत्त्व दिले असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एम.एम.बलांडे यांनी केले. मुलंगंध कुटी बुद्ध विहार,सुभेदार रामजी नगर,लातूर येथे भारतीय बौद्ध महासभा,लातूर जिल्हा प. विभाग आणि लातूर तालुका यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभेदार रामजी सकपाळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलताना ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.लहू वाघमारे हे होते तर विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय गवई,सरचिटणीस अशोक शिंदे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वरी बटवाड, हिराचंद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना बलांडे म्हणाले की, आज रामजी बाबांचा ११२ वा स्मृतिदिन आहे.आजच्या दिनी आपण आपल्या मुलाबाळांना त्यांचा आदर्श दिला पाहिजे असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. संजय गवई म्हणाले की,सुभेदार रामजी मालोजी सकपाळ हे एक जागृत व आपल्या पाल्याला घडविण्यासाठीचे दक्ष पालक होते. त्यांनी डॉ.बाबासाहेबांच्या बालपणापासूनच त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची नियोजनबद्ध काळजी घेतली होती.ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करणे हे काम त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक केले असेही ते म्हणाले. यावेळी हिराचंद गायकवाड, प्रा.शिवशरण हावळे,ज्ञानेश्वरी बटवाड आणि अशोक शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय भोसले यांनी केले तर आभार हणमंत कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच सुभेदार रामजी नगर येथील नागरिक,उपासक व उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो