कळंब – दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करून हुतात्मा दिन पाळण्यात आला.तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा माजी खासदार दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व भाई उद्धवराव पाटील यांच्या कार्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी दिली.यावेळी महात्मा गांधी यांच्या विचारधारेचे महत्त्व आणि उध्दवराव पाटील यांच्या कार्याचा वारसा यावर मार्गदर्शन करण्यात आले.त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याची प्रेरणा या प्रसंगी उपस्थितांना मिळाली. याप्रसंगी शिक्षक एच.ए.पानढवळे,बी.व्ही. ओव्हाळ,एस.जी.सूर्यवंशी व शिक्षक तर कर्मचारी विनायक शिंदे व विनोद चाळक व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन