कळंब- वाशी तालुक्यातील मौजे तेरखेडा येथील फटाका कारखान्यात दि.२९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या स्पोटातील जखमी कामगार मजुरांना अर्थसहाय्य,कपडे,व अन्नधान्य तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी श्रमिक मानवाधिकार संघाच्या वतीने वाशी येथील ज्येष्ठ साहित्यिक श्रावण भाऊ क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली कळंब चे उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,वाशी तालुक्यातील मौजे तेरखेडा येथील शिवारात गट नंबर १२८१ मध्ये दि.२९ जानेववारी २०२५ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास छोटुमियाॅ दारुवाले यांच्या मालकीचा बाबा फायर या फटाके निर्मितीच्या गोदामामध्ये स्पोट होउन अंदाजे ८ मजुर गंभीर जखमी झालेले आहेत. त्या जखमी मजुरांना अर्थिक सहाय्य,व अन्नधान्य तात्काळ पुरवठा करावा,तसेच जखमी झालेल्या मजुरांचा विमा उतरवलेला आहे का?फटाका कारखाना मालकांनी कायदेशीर बाबींची पूर्तता केली आहे का?याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी.तसेच या फटाका कारखान्याबाबत आपल्या कार्यालयास या पुर्वीही सदरील कारखान्याची व मजुरांची चौकशी करावी म्हणून निवेदन देण्यात आले होते परंतु सदरील निवेदनावर कसल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सदरील प्रकरण गंभीर असून या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर श्रमीक मानवाधिकार संघाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर श्रमिक मानवाधिकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भाई बजरंग ताटे, मानवी हक्क अभियान च्या जिल्हा अध्यक्षा माया शिंदे, मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे,ज्येष्ठ साहित्यिक (महाराष्ट्र राज्य) श्रावण भाऊ क्षीरसागर यांच्या स्वाक्षर्या आहेत.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले