August 8, 2025

मुलांवर विद्यार्थीदशेतच संस्कार होणे काळाची गरज – गणेश शिंदे

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीच्या यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर स्मृति व्याख्यान-२०२५ आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी संस्कार आणि आजची पिढी यावर व्याख्यान देताना गणेश शिंदे म्हणाले,शिक्षण ही समाजपरिवर्तनाची पहिली पायरी असते.असे ओळखून पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरूजींनी प्रेरित होऊन ज्ञान प्रसारक मंडळ संस्था स्थापन केली.तसेच मुलांनी ध्येय समोर ठेवून अभ्यास करून यशस्वी व्हावे.योग्यवेळी निर्णय घ्यावा लागतो.
  • मोबाईल, इंटरनेट,फेसबुक,इन्स्टाग्राम आणि ट्विटर यांसारख्या गतिमान सामाजिक माध्यमांमुळे ही पिढी कुठेतरी भरकट जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी आईवडीलांनी मुलांना वेळ काढून त्यांच्याशी वेळोवेळी विचारपूस करून सुसंवाद साधला पाहिजे.खऱ्या अर्थाने आजच्या पिढीवर विद्यार्थी दशेतच भविष्याची जडणघडण उत्तमप्रकारे होऊ शकते.विज्ञान- तंत्रज्ञानासह संत ज्ञानेश्वर,संत नामदेव,जगद्गुरु तुकाराम,संत गाडगेबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या आदर्श विचार व मूल्यसंस्कार रुजविण्याची नितांत आवश्यकता आहे.”
    प्रारंभीस संस्थेचे संस्थापक पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजीं आणि संस्थामाता कै.सुमनबाई (आईसाहेब ) मोहेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विचारपीठावर उद्घाटक डॉ. अशोकराव मोहेकर (सचिव,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा),रो. अध्यक्ष अरविंद शिंदे,रो.प्रॉजेक्ट चेअरमन संजय देवडा यांची उपस्थिती होती.
    पुढे ते म्हणाले,“वर्तमानात दिवसेंदिवस व्यसनाधीनता, नैराश्य यासारख्या सामाजिक समस्या उद्भवत आहेत,अशा परिस्थितीत संस्काराच्या माध्यमातून चांगला समाज निर्माण होऊ शकतो.त्यासाठी असे विचारपीठ असायला पाहिजेत.तसेच त्यांनी विद्यार्थ्याना काय सांगू राणी मला गांव सुटेना ही भावनिक कविता सादर करून ग्रामीण भागाशी आपल नात टिकवून ठेवण्याचा उपदेश ही दिला.”यावेळी प्रा.वसंतराव मडके,प्रा.डॉ.डी.एस.जाधव,प्रा.डॉ.संजय कांबळे,प्रा.पल्लवी उंदरे,प्रा.ए.आर.मुखेडकर,प्रा. अर्चना पाटील,प्रा.अंजलीताई मोहेकर तसेच उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान,डॉ.के.डी.जाधव, अप्पासाहेब मिटकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.सुशील तीर्थकर, प्रा.डॉ.बाबासाहेब सावंत,सतीश मांडवकर,यावेळी शि.म.ज्ञानदेव मोहेकर ट्रस्ट आणि रोटरीचे क्लबचे सदस्य तसेच जनजागृती शाळा,विद्याभवन हायस्कूल,मॉडेल इंग्लिश स्कूल,ज्ञानोद्योग विद्यालय,मोहा आदी शाळेतील विद्यार्थी,शिक्षक, शहरातील शिक्षण प्रेमी नागरिक, पत्रकार,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांनी केले.अतिथीचा परिचय रो.संजय घुले यांनी तर उपस्थितांचे आभार रो.अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मानले. व्याख्यानमालेची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.
error: Content is protected !!