आष्टा (संघपाल सोनकांबळे ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे दि.२५ जानेवारी २०२५ रोजी कै.सुमनबाई (आई) मोहेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी कै. सुमनबाई मोहेकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या समाजसेवेचा व व्यक्तिमत्त्वाचा सखोल आढावा घेतला.आपल्या भाषणात रामटेके यांनी सांगितले की,कै.सुमनबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि शिक्षण प्रसारासाठी समर्पित केले.त्यांची दूरदृष्टी आणि निःस्वार्थ भावना आजही प्रेरणादायी आहे. कार्यक्रमाची सांगता उपस्थितांनी कै.सुमनबाई यांना आदरांजली अर्पण करून आणि त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा संकल्प करून केली. यावेळी सूत्रसंचालन शशिकांत मांजरे तर आभारप्ररदर्शन नामदेव अनंत्रे यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप