March 26, 2026

विद्यामंदिर हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  • भूम ( संघपाल सोनकांबळे ) –– ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कूल येथे दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    या प्रसंगी प्रशालेचे मुख्याद्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सर्व प्रथम कै ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) गुरूजी तसेच संविधान निर्माते डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन करण्यात आले.
  • त्यानंतर संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रशालेतील सहशिक्षक मांजरे एस. ए. यांच्याकडून तंबाखू मुक्ती शपथ देण्यात आली.भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो.हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून आणि त्यागातून झाली होती. ध्वजारोहणानंतर गावातून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच प्रशालेमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले.विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचे पारितोषिक वितरण तसेच भूम तालुक्यात बी एल ओ म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने सुजीतकुमार जाधव यांचा देखील सत्कार करण्यात आला.

  • या प्रसंगी स्थानिक संस्थेचे प्रशासकीय अधिकारी,शालेय समितीचे अध्यक्ष श्रीमान चंद्रकांत (आबा) काकडे,स्थानिक शालेय समितीचे सर्व सदस्य श्रीमान अरुण (दादा) काकडे, तानाजी (मामा) गिलबीले ,लोखंडे, तसेच आष्टा गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनिल (बापू) जाधव व सर्व ग्रामस्थ ,पालक आवर्जून उपस्थित होते.
    तसेच सर्व शिक्षक नामदेव अनंत्रे, संघपाल सोनकांबळे, श्रीमती निर्मला वाघमारे शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. सुजीतकुमार जाधव,बबन यादव आदी उपस्थित होते.

 

error: Content is protected !!