मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर यांच्या हस्ते महात्मा गांधी व संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून जनजागृती पर घोषणा देत विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित करण्यात आली. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक डी.बी.मडके,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे,कमलाकर शेवाळे,प्रा. विठ्ठल जाधव,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य शशिकांत कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहशिक्षक संजय मडके,सतिश मडके,सुर्यकांत गुंगे,शैलेश गुरव, जनार्दन भामरे,अशोक राऊत, मंगलदास पवार,प्रा.नवनाथ करंजकर,प्रा.राहुल भिसे, प्रा. अमित जाधव, प्रा.देवदत्त पाटील,श्रीमती निता सोनवणे, श्रीमती उषा पांचाळ, प्रा. श्रीमती प्रतिभा सावंत,शेखर गिरी, अमितकुमार शर्मा,धनंजय परजणे,अनूप पाटील,अमरसिंह पाटील,बी.एम.काळे,दिगांबर शिंदे,अंगद आगलावे,विष्णू जाधव,ज्ञानोबा टोपे, प्रथमेश साडेकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर शेवाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नवनाथ करंजकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन