February 9, 2026

विद्या मंदिर हायस्कूलची सहल ज्ञान वृद्धी साठी उपयुक्त

  • आष्टा (यशपाल सोनकांबळे) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्या मंदिर हायस्कूलच्या विद्यार्थी व विद्यार्थ्यींची शैक्षणिक सहल दि.६ जानेवारी ते १० जानेवारी २०२५ कालावधीत उत्साहात संपन्न झाली.
    सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती,त्यांचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व समजून घेता आले असेल.ही सहल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरणारी झाली.
    सहलीच्या सुरुवातीला मुख्याध्यापक आनंद रामटेके व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत आबा काकडे यांच्या हस्ते शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून सहलीच्या पुढील ठिकाणी मार्गस्थ झाली.
    पंढरपूर- विठ्ठल-रखुमाईचे पवित्र मंदिर,वारकऱ्यांच्या श्रद्धास्थान,कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर: महाराष्ट्रातील अष्टदश शक्तिपीठांपैकी एक,ज्योतिबा मंदिर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ,बाळूमामा मंदिर, आदमापूर: बाळूमामांचा भक्तिभाव व चमत्कारांचा अनुभव घेण्याचे ठिकाण,सिंधुदुर्ग किल्ला:छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला किल्ला,गणपतीपुळे: निसर्गरम्य किनारा आणि स्वयंभू गणपती मंदिर,रायगड: छत्रपती शिवाजी महाराजांचे गडराज्य आणि समाधी स्थळ, प्रतापगड: शिवाजी महाराज आणि अफजलखान यांचा ऐतिहासिक प्रसंग येथे घडला,महाड येथील चवदार तळे:विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेविरुद्ध १९२७ मध्ये येथे ऐतिहासिक सत्याग्रह केला होता.

  • विद्यार्थ्यांना सामाजिक सुधारणा आणि समानतेचा संदेश देण्यासाठी ही जागा महत्त्वाची आहे,महाबळेश्वर: निसर्गरम्य डोंगराळ भाग, पाचगणी आणि स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध,अकलूज आणि फलटण: ऐतिहासिक स्थळे आणि परंपरांचा वारसा.
    विद्यार्थ्यांना ही सहल नक्कीच महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाशी जोडणारी ठरली आहे.अशा प्रकारच्या सहलींनी विद्यार्थी अधिक प्रगल्भ आणि इतिहासजाणकार बनण्यासाठी उपयुक्त ठरली आहे.
    या सहलीच्या कालावधीत विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्याध्यापक आनंद रामटेके,ज्येष्ठ शिक्षक नामदेव अंतत्रे,शशिकांत मांजरे,श्रीमती निर्मला वाघमारे सोबत कर्मचारी बबन यादव व सुजितकुमार जाधव यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!