धाराशिव (जिमाका)- जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांना निवडश्रेणी देण्यासाठी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद धाराशिव येथे सादर करणेबाबत कळविले होते.तसेच शिक्षकांनी सुद्धा गटशिक्षणाधिकारी कार्यालयास प्रस्ताव सादर केलेले आहेत.निवड श्रेणी देण्यासाठी शिक्षकांना एकाच पदावर २४ वर्षे सेवा आवश्यक करण्यात आलेली आहे. याबाबतची यादी तालुकास्तरावर निवड श्रेणीसाठीचे ऑनलाईन सेवाअंतर्गत प्रशिक्षण आवश्यक आहे.पात्र दिनांकापूर्वीचे सलग तीन वर्षाचे गोपनीय अहवाल आवश्यक आहे व उच्च अहर्ता प्राप्त असणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची तात्पुरती स्वरुपात यादी तपासून प्रसिद्ध स्तरावर तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.याबाबत शिक्षकांच्या काही हरकती, मुद्दे,दावे असतील तर संबंधित तालुका गटशिक्षणाधिकारी यांचेकडे ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरुपात पुराव्यासह सादर करावेत.जेणेकरून त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल.मुदतीनंतर आलेल्या हरकतीचा विचार केला जाणार नाही.असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांनी कळविले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला