धाराशिव – अभिषेक साहेबराव बोळके याची न्युयार्क येथील संगणकशास्त्रातील उच्च शिक्षणासाठी टुरो विद्यापीठात निवड झाली आहे.अभिषेकचे दहावी पर्यंतचे शिक्षण भोसले विद्यालयात झाले.उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील साहेबराव बोळके यांचे ते चिरंजीव असून कनगरा सारख्या ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस जाणार असल्या बद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या त्याच्या यशाबद्दल त्याचा प्रा.रवि सुरवसे,कवी पी.के.बनसोडे, हरीभाऊ बनसोडे,अँड.अजित कांबळे,विजय गायकवाड यांनी हार,पुष्पगुछ व अर्जुन केळुसकर यांनी लिहिलेले बौध्द चरित्र देवून त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी अभिषेकची आई संगिता बोळके,वडील साहेबराव बोळके,बहिण आरती बोळके आदिंची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला