August 8, 2025

सैनिक कल्याण कार्यालय लिपिक – टंकलेखक पदासाठी २९ जानेवारीला मुलाखती

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,धाराशिव येथे कंत्राटी पद्धतीने माजी सैनिक महामंडळ मर्या (मेस्को),पुणे तर्फे बाह्ययंत्रणेद्वारे (आउटसोर्सिंगद्वारे) लिपिक टंकलेखक या पदाकरिता नेमणूक करावयाची आहे.आकर्षक मासिक पगार,दर सहा महिन्याला वाढीव महागाई भत्ता,कामगार कायद्यानुसार ई.पी.एफ.,ई.एस. आय.,ग्रॅज्युएटी इत्यादी फायदे देण्यात येणार आहेत.
    तरी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक लिपिक टंकलेखक यांनी दूरध्वनी क्रमांक -०२४७२-२२२५५७ भ्रमणध्वनी क्रमांक-७५८८५२७५५४ यांच्याशी संपर्क साधावा.तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धाराशिव येथे आपल्या सर्व मूळ कागदपत्रासह २९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे.असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.
error: Content is protected !!