धाराशिव (जिमाका) – रस्ता सुरक्षा अभियान २०२५ “परवाह” उपक्रमातंर्गत विविध जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने धाराशिव येथे १७ व १८ जानेवारी रोजी जिल्हा धाराशिव विद्यार्थी वाहतूक संघटना,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव व वाहतूक नियंत्रण शाखा धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती साठी सिट बेल्ट,स्कूल बस रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले.यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांतराव साळी,मोटार वाहन निरीक्षक प्रशांत भांगे,पूनम पोळ,सहायक मोटर वाहन निरीक्षक कुनाल होले,अजित पवार,सिध्देश्वर मस्के,सागर काशविद व पोलीस निरीक्षक सचिन बेन्द्रे तसेच धाराशिव जिल्हा विद्यार्थी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष गोपाळ शिंदे,उपाध्यक्ष नवनाथ बारकूल,सचिव दादासाहेब गवळी सर्व पदाधिकारी,सदस्य, सभासद उपस्थित होते. रॅलीमध्ये एकूण ५५ बस सहभागी झाल्या होत्या.उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बस चालकांसाठी रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने,वाहनांचे कागदपत्रे व सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीबाबत मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा अभियान २०२५ परवाहअतंर्गत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांच्या मार्गदर्शनात मोटर वाहन निरीक्षक एस.एस.बंग यांनी तुळजापूर येथील लोटस इंग्लिश स्कूल (पोद्यार) व जिजामाता कन्या शाळा येथे विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाविषयी मार्गदर्शन केले. वाहतूक चिन्हांवर प्रश्नमंजुषा घेऊन जिंकलेल्या विद्यार्थ्यांना पेन,पुस्तक याप्रमाणे शालेय साहित्याचे बक्षीस देण्यात आले.तसेच दोन्ही शाळेत मिळून एकूण ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला