उमरगा – एका बाजूला विकासाच्या नावाखाली प्रचंड वृक्षतोड होत असताना जगभर हाहाक्कार माजला आहे.तर दुसऱ्या बाजूला माणूसपण जपणारी वृक्षप्रेमी नावाची चळवळ कुठे ना कुठे दैदिप्यमान होत असताना दिसते आहे. मानवी गरजा भागविण्यासाठी वृक्षतोड,बिल्डिंग बांधण्यासाठी वृक्षतोड,कारखाने उभे करण्यासाठी वृक्षतोड,एकूणच काय दळणवळणाची संसाधने निर्माण करण्यासाठी ठीक ठिकाणी झाडांच्या कत्तली होताना आपण पाहत आहोत.जेवढा माणसांचा पसारा वाढतो तेवढी वृक्षतोड होत असताना आपण पाहत असतो. निसर्ग जतन केला तर माणूस जतन होणार आहे हा विचार आता माणसांच्या मनातून मरण पावत चालला आहे.तरीही माणसांमध्ये माणूसपण जपणारी वृक्षप्रेमी,निसर्गप्रेमी लोक या समाजामध्ये निर्माण होत आहेत याचा अभिमान वाटतो. अशी चळवळ धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर आणि तालुक्यामध्ये निर्माण झालेली दिसते आहे.आपापला व्यवसाय सांभाळून सकाळ आणि संध्याकाळी या दोन वेळी झाडे लावणे,त्याला पाणी घालणे, कुंपण घालणे,सातत्याने बाळांचं संगोपन आया करतात त्या पद्धतीने झाडाचे संगोपन करणारे समाजामध्ये अनेक मित्र तयार झालेले आहे याच सोबत उमरगा या ठिकाणी मुख्य कार्यालय असलेल्या समाज विकास संस्थेने नारंगवाडी,नाईचाकूर,ब्रह्मपुरी कॉलनी,मातोळा आणि जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना रोपे देऊन ती वाढवल्याची नोंद आहे. या सर्व निसर्ग प्रेमींना वृक्षप्रेमींना देशभरातल्या नाही तर जगातल्या सर्व लोकांच्याकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
More Stories
बहुजन हिताय वसतिगृहात प्रेरणादायी कार्यशाळा
संप्रदायासोबत सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी राहावी – आकांक्षा चौगुले
शब्द नवे,अर्थ नवे! युवा कवींच्या काव्यदीप संमेलनाने उमरगा काव्यमय!