August 9, 2025

कळंब गाणंगापूर बस गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी

  • कळंब – कळंब बसआगारातून प्रवासी सेवेसाठी परिसर व लांब पल्ल्यासाठी बस गाडी सोडल्या जातात परंतु श्री क्षेत्र गाणंगापूर साठी बस सेवा उपलब्ध नाही तसेच इतर आगाराच्या कळंब मार्गे श्री क्षेत्र गाणंगापूरकडे जाणाऱ्या बस गाड्याची सोय नाही यामुळे प्रवाशांना गैरसोय होत ही प्रवाशांची व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय दूर व्हावी व तात्काळ कळंब – इटकळ – हन्नूर- अक्कलकोट मार्गे गाणंगापूर ही बस सेवा सुरू करावी अशी मागणी कळंब येथील प्रवासी व ज्येष्ठ नागरिक यांच्यावतीने कळंब बस आगार सहाय्यक व्यवस्थापक अभिजीत धाकतोडे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
    या निवेदनावर ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ,उपाध्यक्ष अच्युतराव माने,रामभाऊ कवडे, दगडू किलचे,माधवसिंग राजपूत, उत्तरेश्वर शिंगणापूरे,सचिन क्षीरसागर यांच्या साह्या आहेत.
error: Content is protected !!