June 23, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयाची एक दिवसीय क्षेत्रभेट

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार उच्च माध्यमिक विद्यालयात,मोहा येथील विद्यार्थ्यांना एक दिवसीय क्षेत्रभेटीचे आयोजन अभिषेक मळा,सोलापूर येथे नुकतेच करण्यात आले.
    याप्रसंगी उच्च माध्यमिक विद्यालयातील ५० विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,सहल विभागाचे प्रमुख प्रा.नवनाथ करंजकर,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले. प्रा.श्रीमती प्रतिभा सावंत तसेच प्रा.राहुल भिसे,सहशिक्षक संजय आडणे, क्रीडा विभाग प्रमुख संजय मडके,प्रा.रोहित मोहेकर, प्रा विठ्ठल जाधव,प्रा.देवदत्त पाटील,प्रा.दिग्विजय पाटील, प्रा.अमित कुमार शर्मा,प्रा.शेखर गिरी,आदींनी या आयोजनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.विद्यार्थीनींनी या क्षेत्रभेटीत अनेक साहसी तसेच मजेदार क्रीडा प्रकारांचा आनंद लुटला तसेच हुरड्यासह अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. अशा अभ्यासपूरक सहलींचे आयोजन वेळोवेळी व्हायला हवे अशा भावना विद्यार्थीनींनी याप्रसंगी व्यक्त केल्या.
error: Content is protected !!