कळंब- होमिओपॅथी डॉक्टरांना आलोपॅथीची औषधे लिहून देण्याची परवानगी अन्न व औषधे ( एफ डी ए) प्रशासनाने जाहीर केल्यामुळे आलोपॅथी डॉक्टरांनी त्याला कडाडून विरोध केला असुन सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. एफ.डी.ए च्या निर्णयाविरुद्ध लवकरच आय एम ए कोर्टात दाद मागणार आहे असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,केवळ एक वर्षाचा फॉर्माकॉलाॅजीचा कोर्स करून कोणताही डॉक्टर आलोपॅथीची प्रॅक्टिस करूच शकत नाही.त्याला त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान अवगत असने खूप आवश्यक असते.निरनिराळ्या औषधांच्या मात्रा,त्यांचे फायदे-तोटे,ड्रग्ज रियॅक्शन्स, ई ची ईतंभुत माहिती असावी लागते. केवळ एक वर्ष कोर्स करून अर्धवट राव निर्माण होतील आणि जनतेच्या आरोग्याशी खेळतील व त्याची किंमत जनतेस मोजावी लागणार हे मात्र नक्की. .
** आय एम ए कोणत्याही पॅथी विरोधात नसुन सर्व पॅथिचा सन्मान करते. ज्याने ज्या पॅथिचे शिक्षण घेतले त्यांने त्या त्या पॅथिची प्रॅक्टिस करावी, त्यामध्ये संशोधन करावे अशी आय एम ए ची भूमिका राहिलेली आहे.केवळ एक वर्षाचा कोर्स करून सक्षम डॉक्टर बनूच शकत नाही. असे केल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.क्रॉसपॅथिचे प्रकरण न्यायप्रविष्ट असुन एफ.डी.ए च्या निर्णया विरूद्ध आय.एम.ए कोर्टात दाद मागणार आहे. – डॉ.रामकृष्ण लोंढे माजी अध्यक्ष,आय.एम.ए महाराष्ट्र राज्य
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा