March 26, 2026

मोहेकर महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे रासेयो विभागाच्या वतीने संविधान दिन व संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुदायिक प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून घेण्यात आली.तसेच संविधान जनजागृतीची रॅली ही काढण्यात आली.
      संविधान दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार,उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक तथा उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव तसेच राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी डॉ.संदीप महाजन,डॉ.पल्लवी उंदरे,डॉ. राघवेंद्र ताटीपामुल तसेच प्रा. नितीन अंकुशराव, प्रा.बोंदर, अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर, प्रा.नागनाथ अदाटे, प्रा.देवकाते, प्रा.गणेश आडे,प्रा.विलास ओमन,प्रा.हंडीबाग,प्रा.भिसे, अधिक्षक हनुमंत जाधव, सा.साक्षी पावनज्योत उपसंचालक तथा सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे,प्रा.विनोद खरात,अमोल सुरवसे,बालाजी डिकले,उमेश साळुंखे,रमेश पवार आणि बहुसंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.
error: Content is protected !!