August 10, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात संविधान दिन साजरा

मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात संविधान दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप यांच्या हस्ते पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांच्या उपस्थितीत भारताचे संविधान सुपूर्द करतानाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य संजय जगताप यांनी सांगितले की २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली,म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजेच घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते.भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं, त्याची चौकट त्यांनी आखली, विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती,त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार परमपूज्य डॉ.बाबासाहेबांनी केला.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला.भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला अशी माहिती प्राचार्य संजय जगताप यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी याप्रसंगी संविधानाचे वाचन केले.
कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!