कळंब (माधवसिंह राजपूत ) – विधानसभेच्या धाराशिव- कळंब मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आले.
६३.७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. यामुळे १२ उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.दिनांक २३ नोव्हेंबर रोजी या झालेल्या मतदानाचा निकाल जाहीर होईल व पुढील पाच वर्षासाठी मतदारसंघाचा आमदार कोण याचा फैसला आजच्या पार पडलेल्या मतदानातून होणार आहे.तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. धाराशिव कळंब विधानसभेसाठी एकूण ५० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यातील सात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले. शिल्लक ४३ उमेदवारापैकी ३१ उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार होते. यामध्ये महाविकास आघाडी शिवसेना उबठा पक्षाचे कैलास घाडगे पाटील ( मशाल ) व महायुती शिवसेना शिंदे पक्षाचे अजित पिंगळे (धनुष्यबाण ) यांच्यात लढत झाली आहे. या निवडणुकीत बाजी कोण मारणार यावर याबाबत अंदाज, आडाखे बांधले जात असून पैजा लावल्या जात आहेत.दिनांक २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली व संध्याकाळी ६ वाजता मतदान संपले थंडी सुरू झाल्याने सकाळी मतदानाचा वेग कमी होता.दुपारी एक नंतर मतदानाचा वेग वाढला सकाळी अकरा वाजेपर्यंत १५.९२ % मतदान झाली तर दुपारी १ वाजेपर्यंत ३०.५२ % मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजाविला. दुपारी ३ वाजता एकूण ३७४७६८ मतदारांपैकी १६७३१६ मतदार यात पुरुष ८८१७२ स्त्री ७९१४२ इतर ०२ एकूण टक्केवारी ४४.६४ % तर दुपारी पाच वाजता ५६.२२ % मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावीला मतदान सहा वाजता संपले एकूण ६३.७५% मतदान झाले आहे पुढील उमेदवाराचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे . शिवसेना उबठा उमेदवार कैलास घाडगे पाटील, तसेच शिवसेना ( शिंदे ) पक्षाचे उमेदवार अजित पिंगळे वंचित बहुजन आघाडीचे अॕड,प्रणित डिकले यांनी कळंब शहरातील सर्व २० मतदान केंद्राला भेटी दिल्या,शहरात मतदारात उत्साह जाणवत होता. निवडणूक रिंगणातील उमेदवार,पक्ष व त्यांचे निवडणूक चिन्ह – अजित पिंगळे शिवसेना शिंदे ( धनुष्यबाण ) ,कैलास पाटील शिवसेना ,उबठा ( मशाल ) देवदत्त मोरे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( रेल्वे इंजिन ) लहू खुणे बहुजन समाज पार्टी , ( हत्ती ) प्रणित डिकले वंचित बहुजन आघाडी, ( गॅस सिलेंडर ) डॉ.रमेश बनसोडे भारतीय जनविकास आघाडी ( ऑटो रिक्षा ) सिराज उर्फ पापा सय्यद टिपू सुलतान पार्टी, ( किटली ) श्रीहरी माळी राष्ट्रीय समाज पक्ष ( शिट्टी )अशोक कसबे अपक्ष (कोट ) दत्ता तुपे अपक्ष (सफरचंद) नितीन काळे अपक्ष (भेंडी ) विक्रम काळे अपक्ष विजेचा ( खांब )
More Stories
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी
ॲड.गुंड,काळे,घोलप,पवार,सुर्यवंशी,सोनवणे यांना पवनराजे स्मृती गौरव पुरस्कार जाहीर
अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण