कळंब – तिच्यावर मी प्रेम करतोय या अल्बम सॉंग चे प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. याप्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून महाराष्ट्राचे लाडके गायक ज्या गाण्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले पाखरा आजाद केलं तुला फेम गायक किशोर जावळे (kk ) आणि या गाण्याचे गीतकार आशिष भाऊ शिंदे तसेच निर्माते पवन घायतडक व महाराष्ट्रातील कलाकार संगीतकार गायक बँजो मालक उपस्थित होते. पाखरा आजाद केलं तुला फेम गायक किशोर भाऊ बोलले की ऋतिक पटेकर हा एक धाडसी मुलगा आहे व सदैव नवनवीन प्रोजेक्ट लोकांसमोर घेऊन येत असतो.तरी मी कळंबकरांना व अख्ख्या महाराष्ट्राला विनंती करतो की जसे प्रेम तुम्ही आमच्या गाण्याला देतात तसेच तुम्ही या गाण्याला द्या व गीतकार आशिष भाऊ मी ही एक ग्रामीण गावातून आलेलो आहे हावरगांव हे माझं गांव आहे एक सोबत येडेश्वरी बँजो या या गाडीवर दोघेही लहानपणापासून काम करत होतो जसा संघर्ष मी केला आहे. तसाच संघर्ष ऋतिक देखील करत आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी लोकांपर्यंत हे गाणं वायरल करायचा आहे. याप्रसंगी या गाण्याच्या क्लिपचे ऋतिक पटेकर यांच्या आई-वडिलांनी अनावरण केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी