धाराशिव तालुक्यात विविध गावात महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांना प्रतिसाद
धाराशिव – काही लोकांनी केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेचा झेंडा उचलला आहे. परंतु,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर आधारित विकासात्मक आणि धाडसी निर्णय घेण्याच्या कर्तव्यभावनेने कार्यरत असलेल्या खऱ्या शिवसैनिकाला निवडून देणे हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.त्यासाठी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि त्यांच्या उद्दिष्टांना पुढे नेणारा मी एक निष्ठावान शिवसैनिक आहे.असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी केले. धाराशिव – मतदारसंघातील खामगाव,कौडगाव (बावी),कावलदरा,बावी,गावसुद,वरवंटी,पोहनेर,बेगडा
,सुर्डी (बे),पिंपरी (बे) व चिलवडी येथे दि.१२ नोव्हेंबर २०२४ मंगळवारी रोजी मतदारांशी महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांनी संवाद साधला. सुरुवातीला गावातील हनुमंत मंदिर ,श्रीराम मंदिर,श्री.जगदंबा देवी,श्री.संत सेवालाल महाराज मंदिरात महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. पुढे अजित पिंगळे म्हणाले की,या निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळावी यासाठी मला भरघोस मतदान करावे,ही माझी जनतेकडे नम्र विनंती आहे.” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात विकासाचे विविध प्रकल्प आणि योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महायुती कटिबद्ध असून,या निवडणुकीत मतदारांनी योग्य निर्णय घेऊन खऱ्या शिवसैनिकाला निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी गावातील मतदार बांधव व महायुतीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी