कळंब — ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे दिनांक १२ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला.यावेळी गुरुजींच्या शिक्षणविषयक कार्याचा,शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत केलेल्या योगदानाचा तसेच विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्ये रुजविण्याच्या त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.वातावरण श्रद्धामय व प्रेरणादायी होते.उपस्थितांनी गुरुजींच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
More Stories
विद्याभवन हायस्कूल कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
12 फेब्रुवारी : कामगारांचा देशव्यापी संप यशस्वी करा
संस्थामाता सुमनताई मोहेकर स्मृतिदिन विशेषांकाचे उत्साहात वितरण