September 20, 2026

मोहेकर महाविद्यालयात इंदिरा गांधींना अभिवादन

  • कळंब – भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दि.३१ ऑक्टोबर २०२४ रोजी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतिमेस प्रबंधक हनुमंत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी त्यांच्या असामान्य नेतृत्वगुणांनी आणि कणखर निर्णयक्षमतेने देशाला विकासाच्या आणि सशक्ततेच्या दिशेने पुढे नेले.देशाच्या एकात्मतेसाठी,गरिबी निर्मूलनासाठी आणि स्वावलंबनासाठी त्यांनी घेतलेले कठोर निर्णय आजही प्रेरणादायी ठरतात.
    इंदिरा गांधी यांची राष्ट्रसेवा, त्याग,आणि कार्यकुशलता यामुळे त्यांनी भारताच्या राजकारणात एक अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या काळात देशाने जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आणि स्वाभिमानाने उभे राहण्याची ताकद मिळवली. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने अणुशक्तीच्या क्षेत्रात प्रगती केली, हरित क्रांतीसारख्या योजना राबविल्या,आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
    याप्रसंगी विद्यालयाचे प्रबंधक हनुमंत जाधव,अरुण मुंढे,अर्जुन वाघमारे,जयसिंग तांबवे यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!