मतदार राजाची चर्चा कळंब-धाराशिव मतदारसंघ कळंब ( माधवसिंग राजपूत ) – निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष,प्रादेशिक पक्ष,मान्यता प्राप्त पक्ष,संघटना,अपक्ष उमेदवारासाठी ओळख असते. यामुळे आपल्याला निवडणुकीत जनसामान्यात स्थान असलेल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी हा उमेदवारांचा प्रयत्न असतो. २०२४ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून उस्मानाबाद – कळंब विधानसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने विद्यमान आमदार कैलास घाडगे पाटील यांना उमेदवारी निश्चित केली असून ते प्रचाराच्या कामाला लागले आहेत तर वंचित बहुजन आघाडी कडून कळंब तालुक्यातील तांदळवाडी गावचे सरपंच तडफदार युवा नेते प्रणित डिकले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.परंपरागत दावेदार म्हणून महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप,शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार ) या पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारीसाठी दावेदारी केली व कामाला लागा असा आदेश घेऊन या तिन्हीही घटक पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आपले जनसंपर्क अभियान सुरू ठेवले आहे.घटक पक्षापैकी ही जागा ज्या पक्षाला सुटेल त्या घटक पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार मात्र सर्वांनी करावा व आघाडी / महायुतीचा धर्म पाळावा असे सांगण्यात आले होते.अशी चर्चा मतदारात आहे. महाविकास आघाडीतील कळंब तालुका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली दावेदारी पक्षाकडे केली परंतु महाविकास आघाडीतील विद्यामान आमदार कैलास घाडगे पाटील यांची उमेदवारी आघाडीतील नियमानुसार पक्की मानली जात होती व त्यांना उमेदवारी ही जाहीर झाली आहे व ते कामाला लागले आहेत परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आय पक्ष कार्यकर्त्यांनी आमदार कैलास घाडगे पाटील यांच्याकडून काँग्रेस आय पक्ष कार्यकर्त्यांचा सन्मान होत नाही अशी कुरकुर सुरू केली आहे तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही महायुतीतील घटक पक्षातील जवळजवळ सर्व इच्छुक उमेदवार काल-परवा राजधानी मुंबई येथे तळ ठोकून बसले होते पक्ष नेतृत्वाकडून महायुतीचा तसेच पक्ष शिस्तीचा धर्म पाळा असे सांगितले जात असून महायुतीतील इच्छुक शिवसेना उबठा मधून शिवसेना शिंदे मध्ये दाखल झालेले शिवाजी आप्पा कापसे,भारतीय जनता पार्टीला सोडचिट्टी देऊन शिवसेनेत गेलेले सुधीर अण्णा पाटील,गतवर्षी तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज व सध्या शिवसेना शिंदे पक्षाचे सुरज महाराज साळुंखे,कळंबचे माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,शिवसेना शिंदे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन लांडगे , माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप मडके,भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महिला उपाध्यक्ष डॉ.सरोजनी राऊत,तालुकाध्यक्ष अजित पिंगळे,माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे तर राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षाकडून मजबूत दावेदारी करणारे विद्यमान शिक्षक आमदार विक्रम काळे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुरेश पाटील हे इच्छुक जनसंपर्क अभियानामार्फत व कार्यक्रमाचे आयोजन करून मतदारांच्या संपर्कात आहेत.पक्ष नेतृत्वाच्या भेटीसाठी मुंबई गाठलेल्या काही इच्छुक उमेदवारांना तुम्ही परत गावाकडे व मतदार संघाकडे परत जा महायुतीच्या ज्या घटक पक्षाला ही जागा सुटेल तो पक्ष आपला उमेदवार जाहीर करेल व त्याला उमेदवारी दाखल करण्यासाठीचा एबी फॉर्म पोहोचता केला जाईल असे सांगण्यात आले असून यानुसार हे इच्छुक उमेदवार मुंबईहून परतले असल्याचे समजते.या इच्छुक उमेदवारांनी शिवसेना शिंदे पक्षाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यासह मुंबईमध्ये भेट घेतली असल्याचे समजते इच्छुक उमेदवार एकत्रित असल्याचा ग्रुप फोटो सोशल मीडियावर दिसत आहे.उमेदवाराबरोबरच मतदार ही उमेदवारी कोणाला मिळणार ? लढत कशी रंगणार? यामध्ये अनिश्चितता आहे याचबरोबर पालकमंत्र्याचे पुतणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत तसेच सावंत परिवारातील केशव सावंत यांच्याही उमेदवारीसाठी कार्यकर्त्याकडून मागणी आहे. यामुळे उमेदवारीबाबत सस्पेन्स अधिक वाढत आहे,महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे डॉ.प्रताप सिंह पाटील यांनी इच्छुक म्हणून परंडा मतदारसंघात जनसंपर्क दौरा केला असून त्यांची उस्मानाबाद – कळंब मतदारसंघात लढण्याची तयारी आहे मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत ,इतक्या दिवस प्रतीक्षा केली यासाठी आता दोन दिवस थांबावे लागणार आहे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन