कळंब – अशोक विजयादशमीचे औचित्य साधून दि.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागभूमीत नागपूर येथे लाखो अनुयायासमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली,त्यामुळे त्यांनी कोट्यवधी लोकांचे जीवनमान उंचावले. मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी कळंब संघाच्या वतीने दि.१२ ऑक्टोबर २०२४ रोजी शहरातील गार्डनमधील बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे धम्म स्वीकारणे हे केवळ एक धार्मिक परिवर्तन नव्हे,तर सामाजिक न्याय,समानता आणि बंधुत्वाची एक नवी दिशा होती.त्यांच्या नेतृत्वाखाली,लाखो अनुयायांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि आपले जीवन अधिक समर्पित आणि उन्नत बनवले. त्यांच्या विचारधारेने शिक्षण, समानता,आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या विचारांनी आजच्या पिढीसाठी एक आदर्श ठरले आहे. परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान करण्यात येईल आणि त्यांची शिकवण पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातील असा अशी प्रतिज्ञाच मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी तात्याराव वाघमारे, सुरेंद्र शीलवंत,दिलीप वाघमारे, श्रीधर सावंत,अरुण लोंढे,सी.आर.घाडगे,आर.बी. वाघमारे, मारुती गायकवाड,बापू मस्के,सुनील गाडे,शिरसाट,ताकपिरे,कल्याण सावंत आदी सदस्यांची उपस्थिती होती.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन