नागपूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – लोकशाही व संविधान वाचवा हे ब्रिदवाक्य घेऊन संदेश देत असलेले व काही अंशी सफल झालेले राष्ट्रीय नेतृत्व प्रवक्ते योगेंद्र यादवजी यांची प्रेस सभा दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात पार पडली. याप्रसंगी नागपूर दक्षिण पश्चिमचे संभावित उमेदवार प्रफुल भाऊ पटेल हे उपस्थित होते. अतिशय माफक शब्दात खूप सुंदर रित्या आपले करून प्रेस क्लबच्या पत्रकारांना प्रभावित केले.प्रस्तावनेत विदर्भ समन्वयक अविनाश काकडे यांनी प्रेससाठी उपस्थित असणाऱ्या भारत जोडो अभियानाच्या सर्व मंडळींचा परिचय करून दिला व योगेंद्र यादव यांच्या विदर्भ दौऱ्याची थोडक्यात माहिती दिली. महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या त्यामध्ये भारत जोडो अभियानाचे काय महत्त्व असणार आहे हे त्यांनी शब्दात स्पष्ट केले. मागेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकूण १५० लोकसभा मतदारसंघात भारत जोडोच्या कार्यकर्त्यांनी कार्य केले.त्यापैकी ७८ सीट निवडून आल्या त्यांचे असे कदापिही म्हणणे नव्हते की, हे भारत जोडोच्या कार्यकर्त्यांमुळे निवडून आले पण भारत जोडोच्या कार्यकर्त्यांनी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी कार्य केले ते मोलाचे आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा सीटांसाठी निवडणुका होणार आहेत त्यात जवळपास १५० विधानसभा क्षेत्रांमध्ये भारत जोडो कार्यकर्ते कार्यरत असतील व किमान तेवढ्याच शीट निवडून आणण्याचे आवाहन महाविकास आघाडीकडे आहे.व ते पेलण्याचे काम भारत जोडो अभियान कार्यकर्ते करतील अशी ग्वाही दिली.लोकसभेत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशाने सत्तेला हालवून सोडले आहेच व महाराष्ट्र व उत्तरप्रदेश हे दोन राज्य मोलाची भूमिका पार पाडतात. सत्ता पक्षाच्या झूठ, लूट व फूट च्या राजनीतीचे परिपेक्ष्य प्रत्युत्तर महाराष्ट्राची जनता देईल व पांच सुत्रीय कार्यक्रमात काम करुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची पुर्ण तयारी प्रशिक्षणाद्वारे करेल असे सांगितले. त्यांनी जातीय जनगणना का आवश्यक आहे याचेही उत्तर दिले.शिक्षानिती, महाराष्ट्राची समृध्द संस्कृती, औद्योगिक धोरणाची विटंबना, व सत्तापक्षाने सत्तेचा माज करीत जनतेच्या पैशाची करत असलेल्या शासकीय योजनांचा लाडकी बहीण,लाडका भाऊ,व ७९ ईतर योजना या निवडणुकांपूरती असल्याचे सांगून सरकारचा फज्जा उडवला.भारत जोडो अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक संजय मंगला गोपाळ यांनी जयप्रकाश नारायण व राम मनोहर लोहियांचे विचार घेऊन आम्ही सामान्य जनतेत जनजागृती करु व सामान्य जनतेला राजनीतीत सहभाग घेऊन राईट टू ईंफर्मेशन प्रमाणेच राईट टू रिकाॅल व योग्य उमेदवार विधानसभेत पाठविण्याचे व ईव्हन वापस बोलाविण्याचे काम करीत असल्याची माहिती दिली. पंतप्रधानांचे संविधान विरोधी काम,जनसुरक्षा विधेयक ज्यात पंतप्रधानांनी सुध्दा सामाजिक कार्यकर्त्यांना अर्बन नक्षलाईट संबोधून सामाजिक कार्यकर्त्यांचा अपमानाचा बदला जनता या निवडणूकीत घेईल असे वक्तव्य केले.याप्रसंगी अनेक पत्रकारांच्या धारदार प्रश्नांना माफक शब्दात उत्तर देऊन त्यांनी प्रेसवार्ता गाजवली.प्रेसवार्तेत विलास भाऊ भोंगाडे विदर्भ समन्वयक,प्रफुल्ल गुडधे पाटील, ओबीसी महिला महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सुषमाताई भड,व भारत जोडो अभियानाचे नागपूर समन्वयक आनंद कोहाड,सामाजिक कार्यकर्ते अँड.वंदन गडकरी, जेष्ठ्य कार्यकर्ते व समन्वयक किशोर खांडेकर,नागपूर मध्यचे समन्वयक धिरज भिसीकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
More Stories
प्रजासत्ताक दिन : केवळ सोहळा नव्हे, तर जबाबदारीची आठवण
गुटखा विक्री केल्यास आता मोक्का लावणार – मुख्यमंत्री फडणवीस
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आ.कैलास पाटलांचा विधानभवनात प्रहार!