कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी शहरातून प्रकाशित होणारे सा.साक्षी पावनज्योत परिवार व कोथळा येथील अंगणवाडीच्या वतीने एकात्मिक महिला व बालविकास योजनाच्या प्रभारी प्रकल्प अधिकारीपदी ताई बोराडे यांचा नियुक्ती झाल्याबद्दल दि.१८ ऑक्टोबर २०२४ शुक्रवार रोजी सा.साक्षी पावनज्योत पेपर व पुष्पगुच्छ देवून कार्यकारी संपादक अविनाश घोडके व कोथळा येथील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. ताई बोराडे यांनी पर्यवेक्षिकापदी असताना त्यांच्या कार्यकाळात अंगणवाडी सेवेसाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली,स्थानिक मुलांच्या आरोग्य,शिक्षण व विकासासाठी अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्यांनी अंगणवाडीच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले,ज्यामुळे समाजातील महिला व मुलांचे जीवनमान सुधारण्यात मदत झाली. या सत्काराच्या कार्यक्रमात, त्यांनी त्यांच्या अनुभवांवर प्रकाश टाकला आणि भविष्यातील योजनांविषयी चर्चा केली. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना उपस्थितांनी त्यांना आभार मानले व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कोथळा अंगणवाडी क्रं – ३२२,३२३,३२५,३२६,३२४ मधील कार्यकर्ती राजश्री शिंदे,कोमल बोबडे,कल्पना बोबडे,अश्विनी शिंदे,मोनिका भोसले,कल्पना राऊत,लता पाटील आदींची उपस्थिती होती.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन