February 9, 2026

शिक्षण मंडळाच्या सदस्य पदी सुशीलकुमार तिर्थकर यांची निवड

  • कळंब ( साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने संचालक व मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब प्रशालेतील सामाजिक शास्त्र विषयाचे जेष्ठ शिक्षक सुशीलकुमार सुधाकरराव तिर्थकर यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,लातूर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
    त्याबद्दल त्यांचा सत्कार ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, विद्याभवन हायस्कूल कळंबचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस, उपमुख्याध्यापक कुंभार व्ही.जी, पर्यवेक्षक विक्रम मयाचारी यांच्या हस्ते प्रशालेत नुकताच सत्कार करण्यात आला.
    सुशीलकुमार तीर्थकर यांनी प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आराखडा २०१२,भूगोल अभ्यासक्रम विकसन समिती सदस्य तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ पुणे.भूगोल अभ्यास समिती सदस्य २०१३. या शासकीय समितीवर यापूर्वी कार्यरत राहिलेले असून,त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात असलेल्या सक्रिय कार्यातून, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,लातूर. विभागीय मंडळावर शिक्षक (माध्यमिक) संवर्गातून अशासकीय सदस्य पदी नियुक्ती करण्यात तसेच त्यांना माजी मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या हस्ते लोकमंगल राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ते शिक्षकांच्या न्याय व हक्कासाठी लढणाऱ्या मराठवाडा शिक्षक संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत. त्यांनी रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहे.यावेळी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे अध्यक्ष अनिल बापू मोहेकर,उपाध्यक्ष प्रा. आबासाहेब बारकुल आदींसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व पालक वर्गातूनही कौतुक होत आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सागर,तर आभार ज्योतीराम सोनके यांनी मानले.
error: Content is protected !!