लातूर (संघपाल सोनकांबळे ) – ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्ष रवीभाऊ गायकवाड, उपाध्यक्ष विनयभैय्या जाकते व सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने सन २०२४ च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे भंते पय्यानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले व तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षरीची एलईडीचे उद्घाटन सायंकाळी ८.०० वाजता करण्यात आले व रात्री सुप्रसिद्ध गायक अजय देहाडे व आशिष कांबळे यांचा भव्य बुद्ध व भीम गितांचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच धनगर समाजाचे समाजातील दत्ता दुधाळे व त्यांच्या पत्नी व मातंग समाजातील काही व्यक्तींनी बौद्ध धर्म स्वीकारून बौद्ध धम्माची दीक्षा दिली. यावेळी अजित पाटील कव्हेकर, अर्चनाताई चाकूरकर,अश्विन नलबले,लालासाहेब देशमुख, विनोद खटके,साधू गायकवाड, नवनाथ आल्टे,दिलीप गायकवाड,अनंत लांडगे,अनिल बनसोडे, विनोद कोल्हे,प्रज्वल उबाळे,सचिन कांबळे,गोविंद कांबळे,सचिन गायकवाड,जितेंद्र बनसोडे,अजणीकरताई,राहुल डुमणे,संजय सोनकांबळे,लाला सुरवसे,प्रवीण कांबळे,अनंत सोनवणे,उत्तम कांबळे,यशपाल कांबळे व तसेच भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे