June 19, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.08 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 208 कारवाया करुन 1,70,700 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • शिराढोण पोलीस ठाणे: आरोपी नामे-किशोर नवनाथ सावंत, वय 26 वर्षे, रा.खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.08.10.2024 रोजी 14.15 वा. सु.रोकडेश्वर मंदीर ते राममंदीर रोडलगत पत्र्याचे शेड समोर अंदाजे 1,600₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.07.10.2024 रोजी 23.45 वा. सु.तुळजापूर पो ठाणे हद्दीत तुळजापूर मंदीरकडे जाणारे रोडचे उजव्या बाजूस मलबा हॉस्पीटल येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-ज्ञानेश्वर राजेंद्र पवार, वय 24 वर्षे, मंगेश दत्तात्रय घाडगे, वय 23 वर्षे,दोघे रा.शुक्रवार पेठ कणे गल्ली तुळजापूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 23.45 वा. सु. तुळजापूर मंदीरकडे जाणारे रोडचे उजव्या बाजूस मलबा हॉस्पीटल येथे टायगर जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.07.10.2024 रोजी 20.15 वा. सु.धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत सांजा जाणारे रोडलगत पान टपरी समोर इंदीरानगर धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-विशाल लक्ष्मण साठे, वय 30 वर्षे, रा.साठेनगर ह.मु. इंदीरानगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 20.15 वा. सु.सांजा जाणारे रोडलगत पान टपरी समोर इंदीरानगर धाराशिव येथे मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 580 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-राजेंद्र तुकाराम संगेकर, वय 56 वर्षे, रा. लासुरगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर यांना आरोपी नामे बप्पा व त्याचे सोबत सात ते आठ इसम व एक महिला यांनी सोने विकण्याच्या निमित्ताने दि. 07.10.2024 रोजी 13.00 वा. सु. सरमकुंडी फाटा वरुन एनएच 52 हायवे रोडवरील धाराशिव दिशेला जाणारे अंदाजे 4 अंतरावर रोडलगत बोलावून घेवून राजेंद्र संगेकर यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांचे जवळील रोख रक्कम 5,20,000₹ व मोबाईल फोन असा एकुण 5,37,000₹ किंमतीचा माल जबरदस्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजेंद्र संगेकर यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दिनकर मारुती शितोळे, वय 48 वर्षे, रा.सकनेवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचे कडी कोंड अज्ञात व्यक्तीने दि.07.10.2024 रोजी 13.00 ते 17.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे 56 ग्रॅम वजनाचे दागिने व चांदीचे दागिने एकुण 1,63,400₹ किंमतीचा माल व वाघोली येथील राहणारे भारत निवृत्ती मगर यांचे राहाते घराचे कडी कोंडा तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 6 तोळे 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 1,40,000₹ असा एकुण 3,03,400₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिनकर शितोळे यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 (3), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अशोक बापु शिंदे, वय 43 वर्षे, रा. चुर्मापुरी ता. अंबड जि. जालना, यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 21 बी.ए. 2192 जिचा इंजिन नंबर HA11EKG9F03499 व चेसीस नंबर MBLHA11AZG9F03419 ही दि.04.10.2024 रोजी 00.30 ते 01.15 वा. सु. पारगाव शिवारातुन हॉटेल जमींदार धाब्याचे बाजूला असलेल्या रिकामे जागेतुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक शिंदे यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सुरेखा शिवाजी चांदबोधले, वय 23 वर्षे, रा. फुलेनगर माजलगाव जि. बिड, या श्री. येडेश्वरी देवीचे दर्शनासाठी येरमाळा येथे आले असता दि. 08.10.2024 रोजी 14.00 वा. सु. येडेश्वरी देवी मंदीर परिसरात येरमाळा येथे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुरेखा चांदबोधले व प्रमीला पोटोळे यांचे गळ्यातील 9 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 65,000₹ किंमतीचे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेखा चांदबोधले यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शकील महमंद युसुफ काझी, वय 65 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि.धाराशिव,यांचे बावी शिवारातील शेत गट नं 557 मधील शेतीचे अवजारे लोखंडी कुळव, लोखंडी मोगडा, लोखंडी बळी नांगर, लोखंडी 02 पाईप, ट्रकचे जुने पाटे, ट्रॅक्टर ट्रॉलीचा फाळका असा एकुण 90,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शकील काझी यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रुपाली अनिल कांबळे, वय 45 वर्षे, रा.26 लेन नं आण्णाभाउ साठे समाज मंदीर बोपोडी पुणे या श्री. येडेश्वरी देवीचे दर्शनासाठी येरमाळा येथे आले असता दि. 08.10.2024 रोजी 14.00 वा. सु. येडेश्वरी देवी मंदीरातील मेन गाभारा येरमाळा येथे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून रुपाली कांबळे यांचे गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 1,50,000₹ किंमतीचे चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रुपाली कांबळे यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे
  • “ मारहाण.”
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे-केतन अच्युत कुलकर्णी, रा. कथले चौक कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.06.10.2024 रोजी 22.30 वा. सु.कथले चौक कळंब येथे फिर्यादी नामे-अर्चना नरेंद्र तिवारी, वय 50 वर्षे, रा.कथले चौक कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट, लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अर्चना तिवारी यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2), 333, 352, 115(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- बिभीषन राजाराम गांधले, शामल बिभीषन गाधंले, विजय बिभीषन गांधले, तिघे रा. जवळगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.05.10.2024 रोजी 12.30 वा. सु.खुंटेवाडी शिवारात फिर्यादी नामे-सुरेश बबन गांधले, वय 36 वर्षे, रा. जवळगाव ता. बार्शी जि. सोलापूर यांना नमुद आरोपींनी शेतातील रस्त्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप व लोखंडी चैनने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुरेश गांधले यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ फसवणुक.”
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे- एकनाथ जगन्नाथ कांबळे, रा.हासेगाव ता कळंब जि. धाराशिव यांनी दि.12.05.2015 ते दि.06.11.2018रोजी मौजे निपाणी येथील पोस्ट ऑफीस येथे शाखा पोस्ट मास्तर या पदाचा गैरवापर करुन पोस्टातील वेगवेगळ्या योजनेतील खात्यातील एकुण 19,56,499₹ चा अपहार करुन शासनाची फसवणुक केली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आनंद गोविंदराव कौठेकर, वय 52 वर्षे, व्यवसाय नोकरी सहाय्यक डाक अधिक्षक, लातुर उत्तर विभाग ता. लातुर जि. लातुर रा. लातुर ता. जि. लातुर यांनी दि.08.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.दं.वि.सं.कलम 420,409, 465,467,471 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!