March 26, 2026

अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लिंग समभाव समजून घेऊन आचरण करावे – डॉ.दयानंद जटनुरे

  • भैरवनाथ अध्यापक विद्यालयात एकदिवसीय लिंग समभाव कार्यशाळा संपन्न

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – देशाचे आधारस्तंभ व भावी पिढी घडविण्याचे जबाबदारी युक्त कार्य शिक्षकांना करावे लागते त्यामुळे छात्राध्यापकांनी वैज्ञानिक दृष्टीकोण,स्त्री-पुरुष समानता, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, पर्यावरणाचे संरक्षण, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा इत्यादी मूल्यांचा अंगीकार करावा तसेच लिंग समभाव हे एक मूल्य आहे याचे आचरण दैनंदिन जीवनात करावे असे प्रतिपादन धाराशिव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे यांनी केले.ते जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव व मावा मुंबई आयोजित लिंगसमभाव कार्यशाळा समारोप प्रसंगी बोलत होते.
  • या कार्यशाळेत डायटचे प्राचार्य डॉ.दयानंद जटनुरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत या कार्यशाळेत त्यांना नेमके कोणते अनुभव आले हे देखील जाणून घेतले त्यासोबतच अध्यापक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने शिक्षण घेतलं पाहिजे याचे मार्गदर्शन देखील केले.
  • वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालयात सकाळी १० ते ४ या वेळेत भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब,प्रियदर्शनी अध्यापक विद्यालय व सर्वोदय अध्यापक विद्यालय,वाशी येथील छात्र अध्यापकांची लिंग समभाव यावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
    या लिंगसमभाव कार्यशाळेत युनिसेफ व मावा लिंग समभाव समन्वयक सुरज पवार पुणे व
    पंकज पडवळे भंडारा यांनी छात्राध्यापकांना आपल्या मार्गदर्शनात स्त्री-पुरुष समानता व सध्याची परिस्थिती कशी आहे यावर सविस्तर चर्चा केली.

    या कार्यशाळेस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण विभाग,डायटचे अधिव्याख्याता उमेश नरवडे व स्टेनो महादेव वाघमारे यांनी भेट दिली.
    या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य सतिश मातने यांनी तर सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत पवार व आभार प्रा.अविनाश घोडके यांनी मानले.
    यावेळी प्रियदर्शनी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य हुसेन पठाण,प्रा.शारेख काझी व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.मोहिनी शिंदे,विनोद कसबे यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!