कळंब – कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने एम.पी. एस.सी परीक्षेत पहिल्या शंभर मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या हस्ते करण्यात आला. यात डॉ.महेश घाटुळे राज्यात प्रथम येऊन कळंब तालुक्याचे नाव राज्यात गौरविले.तर अशोक बाराखोते राज्यात अकरावा, प्रशांत इंगोले राज्यात ब्याऐंशीवा तसेच डॉ.रोहित पवार राज्यात चौऱ्याऐंशी वा आला त्यानिमित्ताने या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हरिभाऊ कुंभार,रोहन पारेख,मुस्ताक कुरेशी,सतीश टोणगे,डी.ओ. पवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजाभाऊ चोरघडे यांनी केले व आभार प्रा.अमोल शिंगटे यांनी मानले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी