कळंब (विशाल पवार ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेतील इयत्ता नववी ‘अ’ च्या विद्यार्थिनींनी जागतिक ओझोन दिनानिमित्त एक नाटिका सादर केली. वाढते प्रदूषण त्याला रोखण्यासाठी ओझोनचे महत्व सांगितले. ओझोन वाढवा आणि झाडे लावा हा संदेश दिला.मीरा कल्याणकर या विद्यार्थिनींने नाटकाची पार्श्वभूमी सादर केली.समीक्षा चव्हाण,आस्था नखाते,सायली लोकरे,अमृता शिंदे,धनश्री अडसूळ,श्रावणी तांबारे,मनीषा शिंदे,जानवी ठाकूर,सायली जाधवर,सिद्धी तनपुरे,हिना शेख, सिद्धी गिरी,मोनाली भांगे, प्रतीक्षा टकले,ज्ञानेश्वरी यादव, पूजा बोंदर,वैष्णवी काळे,रोशनी खंडागळे,अंकिता शिंदे,श्रेया चव्हाण,श्रावणी दिवटे,ममता गिरी,अक्षरा भिसे व तनिष्का आवटे यांनी सहभाग नोंदवला व ओझोनचे महत्त्व नाटिकेतून सादर केले.या विद्यार्थिनींना श्रीमती बचाटे आर.आर यांनी मार्गदर्शन केले. याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार,उपमुख्याध्यापक व्यंकट कुंभार,पर्यवेक्षक विक्रम मायाचारी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
More Stories
निरोगी गावाकडे वाटचाल;मौजे बोरफडी येथे ‘अनिमिया मुक्त गाव’ उपक्रमाचा भव्य शुभारंभ
ग्रामोदय समितीच्या संचालकपदी उद्योजक गुंडू पवार यांची एकमताने निवड
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात अभिवादन