September 24, 2026

भैरवनाथ औद्योगिक खाजगी प्रशिक्षण संस्थेचे घवघवीत यश

  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब येथील विद्यार्थ्यांनी/प्रशिक्षणार्थींनी अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२३-२४ मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
    प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन ट्रेड प्रथम वर्षात अजय साळुंके 92.33%,प्रणव पाचभाई 92%,सुजल गाडे 91.50%,
    द्वितीय वर्ष आशिष आवाड 93.83%,गोविंद वावरे 92.66%,सुप्रिया चव्हाण 91.83%,
    वायरमन ट्रेड प्रथम वर्ष अभिषेक यादव 85.16%,आशिष बोंदर 80.66%,निखिल हिंगे 80.50%,द्वितीय वर्ष श्रीकांत धाकतोडे 93.66%,प्रीतम हिंगे 92.16%,आदित्य गाडे 91.66%,वेल्डर ट्रेड शुभम लोंढे 82.16%,महादेव पानढवळे. – 81%,ज्ञानेश्वर घोडके 79.83%,कोपा (कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट) सुरज बोंदर 76.50%,वैभव लिमकर 75.33%,ज्ञानेश्वर फस्के. – 71.83% या विद्यार्थ्यांनी आपली मेहनत आणि समर्पण यामुळे कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
    या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशिका कोमल मगर,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,प्रा.अविनाश घोडके, आदित्य गायकवाड, विनोद जाधव,सोनाली ढमाले आदींनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!